Ad will apear here
Next
‘मुकुल माधव’च्या विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

रत्नागिरी : मुकुल माधव फाउंडेशनतर्फे रत्नागिरी येथील गोळपमध्ये चालविण्यात येणाऱ्या मुकुल माधव विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुबक व आकर्षक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या याच मूर्तीची प्रतिष्ठापना शाळेच्या गणेशोत्सवात करण्यात आली. 

मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया यांच्या संकल्पनेतून व शाळेचे मुख्याध्यापक सचिन कोल्हे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून रत्नागिरी येथील मूर्तिकार मयूरेश भारती यांना शाळेत निमंत्रित केले होते. त्यांनी इयत्ता चौथी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्याक्षिक दाखविले. 


गणेशमूर्ती स्पर्धेचे परीक्षण मयूरेश भारती, कला शिक्षक हृषीकेश शेलार, नवीन बिजलानी, रोहित देशपांडे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या निवासानुसार संघ करण्यात आले होते. यामध्ये ऑरेंज हाउसने प्रथम, व्हाइट हाउसने द्वितीय, तर ग्रीन हाउसने तृतीय क्रमांक पटकावला. रितू छाब्रिया यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या अधीक्षक राधा करमरकर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. अश्विनी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक दीपिका पडवळ यांनी आभार मानले.

उपक्रमाविषयी बोलताना रितू छाब्रिया म्हणाल्या, ‘प्रदूषणमुक्त गणेशोत्सव हा संदेश विद्यार्थ्यांमध्ये रुजावा व समाजात एक सकारात्मक संदेश जावा म्हणून हा उपक्रम आयोजित केला होता. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता व प्रेम निर्माण व्हावे म्हणून हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZXDCE
Similar Posts
‘फिनोलेक्स’ आणि ‘मुकुल माधव’तर्फे सेरेब्रल पाल्सीग्रस्तांची तपासणी पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेरेब्रल पाल्सी आजाराने त्रस्त मुलामुलींसाठी राबविण्यात येत असलेल्या अभियानांतर्गत २६६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. सेरेब्रल पाल्सीग्रस्तांसाठी रत्नागिरी आणि सातारा येथे दोन दिवसीय सर्वंकष मूल्यांकन आणि तपासणी शिबिर घेण्यात आले
रितू छाब्रिया यांना ‘एशियन बिजनेस लीडरशिप अॅवॉर्ड’ प्रदान पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज संलग्नित मुकुल माधव फाउंडेशनच्या (एमएमएफ) व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया यांना नुकत्याच दुबई येथे झालेल्या सोहळ्यात ‘एशिया बिजनेस लीडरशिप अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.
तटरक्षक जवानांना राख्या बांधून दिव्यांगांचे रक्षाबंधन रत्नागिरी : येथील आविष्कार संस्थेच्या श्यामराव भिडे कार्यशाळेच्या दहा दिव्यांग विद्यार्थ्यांनी विमानतळ परिसरातील भारतीय तटरक्षक दलाच्या कार्यालयात जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. याच विद्यार्थिनींनी जहाजांवर समुद्रसीमेचे संरक्षण करणाऱ्या जवानांसाठीही राख्या पाठविल्या आहेत.
रत्नागिरीमध्ये कर्करोग शिबिरात महिलांची तपासणी रत्नागिरी : फिनोलेक्स इंडस्ट्रीजने त्यांचे सीएसआर पार्टनर असलेल्या मुकुल माधव फाउंडेशन यांच्या सहयोगाने येथील परकार हॉस्पिटल येथील फिनोलेक्स वूमन्स वेलबीइंग क्लिनिकमध्ये मॅमोग्राफी व कॉल्पोस्कोपी तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये एक ते १३ ऑक्टोबर या कालावधीत ३३७ महिलांची तपासणी करण्यात आली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language